The low-rise bridge on the Nara-Sahur state highway is dangerous  
विदर्भ

(Video) ठेंगण्या पुलामुळे नागरिकांच्या जीवाला घोर, वारंवार तुटतो संपर्क

भूपेश बारंगे

कारंजा (जि. वर्धा) : तालुक्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.  यात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पावसाने हजेरी लावली. एवढ्याच पावसात तालुक्यातील अनेक भागातील नदी नाल्याला पूर आला. नारा- साहूर राज्य मार्गावरील सावरडोहनजीक खडक नदीचा पूल कमी उंचीचा असल्याने याठिकाणी अनेकदा पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांची तारांबळ उडते. 

पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूने नागरिकांना बराच वेळ थांबावे लागते. पुलावरून पाणी वाहत असल्याने पूर्णतः रस्ता ठप्प होतो. यामुळे दोन्ही कडेला वाहनाच्या रांगासह नागरिकांची मोठी गर्दी होते. पुलाची उंची वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

अल्पशा पावसातही पुलावरून पाणी वाहते. यामुळे जवळपास 10 ते 15 गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी एखादी इमर्जन्सी आल्यास  मोठी पंचाईत होते. तालुक्याच्या संपर्क तुटल्याने कोणतेही वाहन ये-जा करू शकत नाही. तालुक्याच्या स्थळावर पोहचण्यासाठी आष्टी तालुक्यातून 40 ते पन्नास किलोमीटर फेरा मारून यावे लागते. पाऊस आले की दररोज येतो पूर त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असले की नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. 

निवडणूक आली की या पुलाचा प्रश्न समोर येतो. निवडणूक झाली की प्रश्न संपतो. सदर पूल जिल्हा परिषद सदस्य नीता गजाम व पंचायत समितीचे सदस्य टीकाराम घागरे यांच्या सर्कलमध्ये येतो. मात्र, यांनी पुलाचा प्रश्न कधी गांर्भीयाने घेतला नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून होतो. 

जीव गेल्यानंतर उंची वाढणार का?
आमच्या गावाजवळील खडक नदीला पाऊस आला की पूर येतो. यामुळे गावाजवळ असलेल्या नारा साहूर रस्त्यावरील पूल आहे. या पुलाला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतो. गावात एखादी व्यक्ती आजारी पडली की त्यांना दवाखान्यात नेता येत नाही. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर पुलाची उंची वाढणार का, रात्रीच्या वेळी पुलावर थांबावे लागते.
राजू गदरे, सावरडोह

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT